आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सरसकट अनुदानासाठी रास्ता रोकोचा इशारा

जळकोट10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील जळकोट नळदुर्ग नंदगाव महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट अनुदान द्यावे अन्यथा दि. २४ (शनिवार ) रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिले आहे.

अतिवृष्टीने पूर्णता खरीप पिके वाया गेलेल्या नंदगाव नळदुर्ग जळकोट मंडळातील शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांची नावे अनुदान यादीत समावेश करावे अशी मागणी जळकोट येथील महाविकास आघाडीने केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खरिपाची पेरणी केल्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये सतत पाऊस पडल्याने पिके पाण्यात बुडाली व सोयाबीन तूर उडीद पिकाचे नुकसान झाले आहे.

काही शेतकरी सोयाबीनवर अक्षरशः नांगर फिरविले अतिवृष्टी होऊनही जळकोट मंडळातील गावची नावे वगळण्यात आली आहेत. ही नावे अनुदान यादीत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच अशोकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष यशवंत कदम, शिवसेनेचे कृष्णात मोरे ,अविनाश किलजे, वसंत सावंत नारायण पटणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान सध्या पाऊस कमी झाला असला तरी परतीच्या पावसाची चिंता सर्वांना आहे.

बातम्या आणखी आहेत...