आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलादिन:भूममध्ये महिलादिनी उसळला जनसागर

भूम7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अलमप्रभू विकास आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने आयोजित केलेल्या लकी ड्रॉचे बक्षिस वितरण सिनेतारका शिवानी बावकरच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सदस्या, उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली व सिनेतारका लागीर झालं जी फेम शिवानी बावकर यांच्या हस्ते खास भगिनींसाठी संसार उपयोगी वस्तूंच्या व भव्य बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मनीषा कुलकर्णी,अनिता वरवडे,सारिका पंडी,विद्या बागडे, सुरेखा भोसले,सोनाली पंडित,उज्वला चौरे , मीना रणबावळे,सुनीता पेंटर,राजेश्वरी माळी, मनीषा एळमकर, यमुनाबाई काळे,ज्योती पोळ,अंजली वेदपाठक,सरिता गुप्ता या महिला विजेत्या ठरल्या.

यावेळी प्रास्ताविक करतेवेळी संयोगीता गाढवे म्हणाल्या की, मागील पंधरा वर्षांच्या काळात शहराचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केलेला असून यापुढे देखील लक्ष असणार आहे.यावेळी आर. जे .अक्षय यांनी संयोगीता गाढवे यांची मुलाखत घेतली व उपस्थित महिलांना उखाणे,गाण्याच्या भेंड्या, विविध प्रकारचे आवाज काढणे याप्रकारचे मनोरंजन करून मने जिंकली.हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी साहिल गाढवे मित्र परिवाराचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जे.अक्षय यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...