आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:नळदुर्ग येथेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवेदन सादर ; मंत्रपदावरून तत्काळ बरखास्त करण्याची केली मागणी

नळदुर्ग5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नळदुर्ग शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला व त्यांना मंत्रपदावरून तत्काळ बरखास्त करावे अशी मागणी राज्यपालाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नळदृग शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे नेत्या संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करून महिलांचा अपमान करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचा काम राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ मंत्रीपदावरून बरखास्त करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी शफीभाई शेख, माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, माजी उपनगराध्यक्ष संजय मोरे, विलास पुदाले, अजित जुनोदी, समीर मोरे, आरेफ जागीरदार व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...