आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू  करण्याच्या मागणीसाठी निवेदन

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी या मागणीसाठी शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्याच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.राज्यातील एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित , अंशतः अनुदानावरील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मागील दहा ते बारा वर्षांपासून प्रलंबित आहे.

या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी या मागणीसाठी शिक्षण संघर्ष संघटना जुनी पेन्शन कोर कमिटी महाराष्ट्र राज्य च्या वतीने भूम येथे तहसीलदारांना गुरुवार दिनांक १५ रोजी निवेदन देण्यात आले . यावेळी डी बी पवार , एल एस शेळके , बी सी मोहिते , प्रदीप कांबळे , संदेश लाखे , डी व्ही बनसोडे , संतोष लोखंडे , एम जी खैरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून विविध संघटनांची आंदोलने चालू आहेत.

बातम्या आणखी आहेत...