आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजनेचा लाभ घेण्याची अडचण:कडदोरा येथील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी निवेदन

उमरगा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडदोरा गावातील नागरिकांना जागेची कमतरता व जागे अभावी घरकुल योजनेचा लाभ घेण्याची अडचण असून गावाचा विस्तार करण्यास जमीन उपलब्ध करून देण्यास सरपंच सुनंदाताई रणखांब यांनी सोमवारी (१२) जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कडादोरा गाव सन १९९३ च्या भुकंपंनातर जुन्या गावापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर विस्थापित झाले. गावाची लोकसंख्या एक हजार ४२८ इतकी होती तर २२५ घरे होती.भूकंपाचे २५ वर्षामध्ये गावातील लोकांची संख्या व कुटुंबाची संख्या वाढली असून गावातील नागरिकांना घरे बांधण्यास जागा उपलब्ध नाही.

घरकूल योजनेचा लाभ घेण्यासाठी गावात कुठे ही जागा शिल्लक नसल्याने घरकूल योजनेचा लाभ घेता लाभार्थ्यांना घेता येत नाही. बऱ्याच नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने रोगराई चे प्रमाण वाढत आहे. या कारणाने गावात सतत भांडणाचे प्रकार वाढत आहेत. याच बरोबर ग्रामपंचायत विविध विकासकामे करण्यास, गावात बगीचा बनवण्यासही जागा आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...