आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनपीएस ची कपात सुरू करणे व आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या रक्कम वर्ग करण्यात यावी या मागणीचे निवेदन मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद यांना महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
शिक्षकांना नवीन परिषाभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू करण्यात आलेली होती. परंतू शासन निर्णयानुसार सदर योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजने कडे वर्ग करण्यात आलेली आहे. शिक्षकांचे ऑनलाईन एनपीएस चे फॉर्म जुलै २०२१ मध्ये भरून घेण्यात आलेले आहेत. सदर फॉर्म हे त्रुटींची पुर्तता करण्यासाठी तालुका स्तरावर मागील ७-८ महिन्यापूर्वी पाठविण्यात आलेले आहेत.ते फॉर्म अदयापही तालुका स्तरावरच आहेत. राज्यातील इतर जिल्हयामध्ये एनपीएस कपाती नियमित सुरू आहेत. एनपीएस कपात बंद असल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक व इतर वैयक्तिक नुकसान मोठया प्रमाणात होत आहे. तसेच आंतरजिल्हा बदली होऊन उस्मानाबाद जिल्ह्यात बदलून आलेल्या एकाही शिक्षकाची पूर्वीच्या जिल्ह्यात कपात करण्यात आलेली रक्कम आपल्या जिल्हा परिषदेकडेअदयापर्यंत वर्ग करण्यात आलेली नाही.
तरी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची कपात रक्कम आपल्या जिल्हयाकडे वर्ग करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद यांना महाराष्ट्र जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर या निवेदनावर तालुकाध्यक्ष नारायण बाकले, जिल्हा मुख्य संघटक प्रशांत घूटे, प्रसिद्ध प्रमुख सचिन भांडे, सचिन पाखरे, सुंदर जगताप, सुधाकर सुरवसे, सतीश गायकवाड आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.