आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:दिव्यांगांच्या मागण्यांसाठी पालकमंत्र्यांना निवेदन

परंडा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंबंधी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, परंडा तालुक्यात अनेक वर्षांपासून दिव्यांगांचे हाल होत आहेत.दिव्यांगाना दारिद्रय रेषेखालील डीआरडी रेशन कार्ड देण्याचा शासन निर्णय असतानाही वाटप झाले नाही, त्यामुळे ते वाटप करावे. दिव्यांगांना घरकुल योजना द्यावी.

ग्रामपंचायतींमार्फत दिव्यांगांना निधी वितरीत केला जात नाही, त्यांना संजय गांधी योजनेंतर्गत तीन हजार रुपये मानधन करावे. महागाईत दिव्यांगांना उपजीविकेसाठी एक हजार रुपये मानधन पुरेसे नाही. अपंग विकास महामंडळामार्फत कर्ज वितरित केले जात नाही, ते वितरित करावे.

मुख्यमंत्री सहायता निधी योजना व प्रधानमंत्री सहायता निधी योजनेतून प्रकरणे मंजूर होऊनही बँका कर्ज देत नाहीत. निवेदनावर दिव्यांग उद्योग समूहाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मिसाळ, सचिव पांडुरंग चोबे, उत्तम मिसाळ, उत्तम शिंदे, गोरख देशमाने, संतोष कुलकर्णी, अशोक भराडे, क्षीरसागर तात्या, राहुल देशमुख यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...