आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:परंड्यात मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ

परंडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचा मंगळवारी परंडा येथे एेतिहासिक मोर्चा धडकला. तालुक्यातील ९६ गावांतील प्रत्येक वाडी-वसाहतीमधून या मोर्चात मराठा बांधव, महिला, तरुण-तरुणी, शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मोर्चेकऱ्यांची १ किलोमीटरपर्यंत रांग होती. या महामोर्चास छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरुवात झाली आणि कोटला मैदानावर समारोप झाला.

बातम्या आणखी आहेत...