आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विषेष:स्नेहसंमेलनातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन‎

वाशी‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अजिंक्य विद्यामंदिरात‎ आयोजित करण्यात आलेल्या‎ विविध गुणदर्शन कार्यक्रमात‎ विद्यार्थ्यांनी सलग दोन दिवस‎ विविध कलागुणांचे सादरीकरण‎ केले. ऐतिहासिक प्रसंग, पोवाडे,‎ धार्मिक प्रसंग, महाराष्ट्राची संस्कृती‎ दाखवणारे देखावे, नाटक,‎ देशभक्तीपर गीत, भारूड, लावणी,‎ भक्तिगीतं आणि वैयक्तिक व‎ सामूहिक नृत्यांतून विद्यार्थ्यांनी‎ कलाविष्कार घडवला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎

कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी‎ गटशिक्षणाधिकारी भारत बन,‎ वाशीचे केंद्रप्रमुख आश्राजी‎ कावळे, अजिंक्य क्रीडा मंडळाचे‎ अध्यक्ष सदाशिव जगताप,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिवसेनेच्या नगरसेविका शामल‎ दत्तात्रय कवडे, माता पालक‎ संघाच्या अध्यक्षा रागिणी चेडे,‎ पोलिस कर्मचारी बाळासाहेब‎ औताडे, पालक संघाचे अध्यक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तथा शेंडीचे सरपंच तुकाराम वीर,‎ नगरसेविका वंदना कवडे, शाळेचे‎ संस्थापक अध्यक्ष श्रीधर पवार,‎ मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार‎ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक‎ शिवाजी दळवे, सहशिक्षिका‎ पल्लवी क्षीरसागर, जयश्री लावंड,‎ स्वप्नाली सांडसे, मनीषा पवार‎ यांनी परिश्रम घेतले.‎

नर्सरी ते नववीतील ६५० विद्यार्थ्यांचा सहभाग‎
शुक्रवार व शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा दरम्यान शाळेच्या प्रांगणात‎ हे कार्यक्रम घेण्यात आले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात इयत्ता नर्सरी ते‎ नववीतील ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. चिमुकल्यांच्या अदाकारीवर‎ खुश होत प्रेक्षक माता, पिता, नागरिकांकडून रोख रकमेची जवळपास २०‎ हजाराची बक्षिसे देखील प्राप्त केली.‎

बातम्या आणखी आहेत...