आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदयात्रा:भारत जोडो पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी आज शहरात पदयात्रा

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो पदयात्रेला समर्थनासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी(दि.४) उस्मानाबाद शहरात पदयात्रा काढण्यात येणार आहे. यात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर पदयात्रेत सहभागी होणार आहेत, असे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे यांनी सांगितले.

सध्या ही यात्रा तेलंगणात असून त्यानंतर महाराष्ट्रात येणार आहे. यात्रेचा मार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून नसला तरी गांधी यांना पाठींबा म्हणून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून उस्मानाबादेत शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता जिजाऊ चौकातून पदयात्रा सुरू होईल. आर्य समाज, अंबाला चौक, जिल्हा रूग्णालय, मारवाडी गल्ली, मेन रोड, नेहरू चौक, दर्गाह रोड, विजय चौक, भारत विद्यालय, शम्स चाैकमार्गे मदिना चौकात यात्रेचा समारोप होईल. पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी येथील विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या पदयात्रेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर सहभागी होणार असून, गांधी यांना पाठींबा देण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...