आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:दोन धर्मात तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्यास कारवाईचा इशारा; पोलिस अधिकारी रमेश बरकते

नळदुर्गएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

समाज माध्यमांवर दोन धर्मात द्वेष निर्माण करणाऱ्या नकारात्मक पोस्ट व्हायरल होत आहेत. धार्मिक सण-उत्सव साजरे करताना दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असे कृत्य कोणी करू नये. असे केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी दिला.

नळदुर्ग पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.९) रमजान, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बरकते यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, महापुरुषांनी दिलेली शिकवण लक्षात घेत समाजातील प्रत्येक घटकास सोबत घेत सर्वधर्मीय सण-उत्सव कायदा व सुव्यवस्था राखत साजरे करावे. याप्रसंगी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, नगरसेवक शहेबाज काझी, मुस्ताक कुरेशी, बसवराज धरणे, माजी उपनगराध्यक्ष शफीभाई शेख, कमलाकर चव्हाण, शिवाजीराव मोरे, अलीम मोहम्मद रजा, महेबुब शेख, मन्सूर शेख, बशीर शेख, ज्योतिबा येडगे, प्रमोद कुलकर्णी, अजित जुनेदी, ॲड. मतीन बाडेवाले, व इतर उपस्थित होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, नगरसेवक शहेबाज काझी, मुस्ताक कुरेशी, शफीभाई शेख, यांच्यासह इतरांनी मनोगत व्यक्त केले.