आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र हळहळ व्यक्त:सावरगावच्या तरुण शेतकऱ्याचा शेतात विजेच्या धक्क्याने मृत्यू

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सावरगाव (द.) येथे विजेचा शॉक लागून तरुण शेतकरी किशोर बोराडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ३० वर्षीय किशोर बोराडे सोमवारी (िद.२) सकाळी शेतातील विद्युत पुरवठा सुरू झाल्याने शेतामधील विहिरीवर विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी किशोरला विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. गावातील अतिशय नम्र होतकरू तरुण शेतकरी किशोर यांचा मृत्यू झाल्याचे कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...