आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूरहुन लातूरकडे जाणाऱ्या पिकअपने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास काक्रंबा येथे ही घटना घडली. पिकअप चालकास संतप्त ग्रामस्थांनी मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला.
माहितीनुसार उस्मानाबाद येथील ख्वाजा नगरातील रियाज शेख (२४) व साहिल शेख (२३) लोहारा येथून इज्तेमा उरकून उस्मानाबादकडे दुचाकीने येत होते. काक्रंबा येथे पोहचले असता तुळजापूरहुन लातूरकडे जाणाऱ्या पिकअपने (एम. एच. २४ ए. यु. २०२५) समोरुन दुचाकीला धडक दिली. यात रियाज जागीच ठार झाला तर, साहिल हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान, पिकअप चालकासही ग्रामस्थांनी मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.