आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद:पैशाच्या वादातून लोहारा येथील तरुणाचा मृत्यू ; लोहारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पैसे देणे-घेण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात शंकर कल्यामोळ (२५)या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.६) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. एकास अटक करून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शंकर यांचा चुलत भाऊ सखाराम कल्यामोळ यांनी फिर्यादीत म्हणले आहे की, रविवारी सकाळी शंकर सखाराम याच्या बरोबर दुचाकीवरून जिजाऊ मेमोरियल इंग्लिश स्कूल जवळील एका ठिकाणी शिंदी पिण्यासाठी गेला होता.

त्यावेळी मुऱ्या उर्फ प्रल्हाद गुंडू घोडके याने शंकर याला तुझ्याकडे माझे असलेले एक हजार रुपये दे, असे म्हणाला. शंकरने शुक्रवारी देतो असे सांगितले. प्रल्हादने पैसे आताच दे नाहीतर तुझी दुचाकी नेतो, असे म्हणत शंकरला उचलून रोडवर आपटले. उमेश गोरे याने शंकर व सखाराम यांना गाडीवर बसवून घरी आणले. तेव्हा शंकर काहीही बोलत नसल्याने त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी शंकरला मृत घोषीत केले. पोलिसांनी मुऱ्या याच्या विरुद्ध गुन्हा केला. शंकरचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या नातेवाईकांनी प्रल्हाद घोडके याचे घर व दुचाकीचे नुकसान केले.पोलिस आल्यावर ते पसार झाले. त्यानंतर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. मृत शंकर याच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...