आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जिल्हा परिषद प्रशाला आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालाजी नगर येथे शनिवारी (दि.१७) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पुढाकारातून आधार कार्ड शिबिर घेण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शकुंतलाताई मोरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, शिक्षणतज्ञ सदानंद शिवदे, गटशिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार, मुख्याध्यापक पद्माकर मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, बालाजी नगर भागातील काळे प्लॉट, हमीद नगर, जुनी पेठ येथील गरीब विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागत होते.
गरीब विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने आधार कार्ड मशीन उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील ५५ विद्यार्थ्यांचे आधार काढण्यास मदत झाली. यामुळे विद्यार्थी संचमान्यतेसोबतच गरीब विद्यार्थ्यांना कायमचे आधार कार्ड मिळाले. यावेळी शाळेतील विविध उपक्रमांची आमदार चौगुलेंनी पाहणी करून मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक केले. दरम्यान, शाळेच शिबिर घेऊन विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय टळली व आर्थिक भुर्दंडही वाचला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.