आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक आयोगाचा निर्णय:42083 मतदारांची आधार जोडणी पूर्ण ; उमरगा तालुक्यात एक ऑगस्टपासून मोहीम सुरू

उमरगा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांचे आधार क्रमांक संकलित करण्यासाठी उमरगा तालुक्यात १ ऑगस्टपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील दोन लाख सात हजार ७९२ मतदारांपैकी आतापर्यंत ४२ हजार ८३ मतदान ओळख पत्रासोबत आधार लिंक केल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. कार्ड धारकांमध्ये दुबार नावे असणे, मतदार यादीत अपूर्ण पत्ता आदी त्रुटी असतात. त्यामुळे मतदार ओळखपत्रास आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ही मोहीम राबवण्यात येत आहे. यात मतदारांचे मतदान ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक केले जात आहे. यासाठी तालुक्यातील २२१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी काम करत आहेत.

२०२४ सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ही मोहिम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये मतदाराचे मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक केले जात आहे. याचे साठी तालुक्यातील २२१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी काम करत आहेत. निवडणूक आयोगाने घरबसल्या मतदान कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत मतदान नोंदणी तथा उपविभागीय अधिकारी गणेश पवार, नायब तहसीलदार नंदकुमार मल्लुरवार, शिवाजी कदम यांनी तालुक्यातील २२१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आधार कार्डची गोपनीयता पाळून मतदान कार्डाला आधार लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत. याअंतर्गत ११ सप्टेंबरला राज्यव्यापी आधार जोडणी शिबिर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मतदारांनी सहभागी होऊन मतदान ओळख पत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी गणेश पवार, सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान, मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरू आहे. यासाठी शिक्षकांना दैनंदिन कामकाजातून पूर्णवेळ सूट देण्याची मागणी तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली होती. त्यासाठी पाठपुरावा केल्याने १९ सप्टेंबरपर्यंत ऑन ड्युटी मतदान ओळखपत्रास आधार लिंक करण्यास सूट देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...