आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जायफळ येथे आम आदमी पार्टी मेळावा ; कार्यक्रमात गावातील अनेक कार्यकर्त्यांचा पक्षामध्येप्रवेश

शिराढोणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील जायफळ येथे शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थिती आम आदमी पार्टी नायगाव सर्कल मेळावा,पार्टी प्रवेश व शाखा उदघाटन समारोह दि २९ रोजी पार पडला. तालुका अध्यक्ष सुभाष पवार, तालुका उपाध्यक्ष प्रा भाऊराव खिचडे, परमेश्वर खडबडे , प्रा. कैलास ओव्हाळ , अकीब पटेल, उस्मानाबाद शहर सचिव नामदेव वाघमारे, समाधान गोसावी हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन करुन करण्यात आले. ॲड. सुभाष पवार यांनी आम आदमी पार्टीचे विचार मांडले, तर अकीब पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संध्या सोनटक्के यानी केले तर सूत्रसचांलन संदीप शेटे यांनी केले.कार्यक्रमाला गावातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील अनेक कार्यकर्त्यानी आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला. यावेळी पक्षाची धोरणे व आगामी कार्यक्रम विशद करण्यात आले.

निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जायफळ शाखा प्रमुखपदी बसवेश्वर गुताडे आणि सचिवपदी ऊत्तरेश्वर खिचडे याची निवड करण्यात आली. तर युवा शाखा अध्यक्षपदी वीरभद्र गुताडे आणि सचिव पदी वैजिनाथ वडगावकर याची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भाऊराव खिचडे यांनी आम आदमी पार्टी कळंब तालुक्यातीलआगामी होणाऱ्या सर्व जिल्हा परिषद पचांयत समिती व नगरपालिका निवडणुका लढविणार कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रा. कैलास ओव्हाळ सर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...