आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागण्या:आप तर्फे  हिवाळी अधिवेशनात विधिमंडळावर जनमोर्चाचा इशारा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पार्टी उस्मानाबाद तर्फे उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या द्वारे मुख्यमंत्री यांना जनतेच्या प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनापूर्वी तात्काळ निर्णय न घेतल्यास येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जनमोर्चा काढणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. आपचे जिल्हा अध्यक्ष राहुल माकोडे यांच्या नेतृत्वात व जिल्हा सचीव मुन्ना शेख यांच्या मार्गदर्शनात राज्यातील जनतेच्या ,शेतकर्याच्या विविध महत्वाच्या विषयावर राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. यामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी पन्नास हजार अनुदान देण्यात यावे, पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई तत्काळ देण्यास बाध्य करावे, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम दयावे, शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे, शेतीला दिवसा सलग बारा तास वीज पुरवठा करावा यासह विविध मागण्यांचा यात समावेश आहे. या वेळी शहराध्यक्ष बीलाल रजवी, मिडीया प्रमुख प्रा. चांद शेख, मुख्तार भाई , संदीप अंकुशराव व आपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...