आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरणा सुरू करण्यासाठी होते आंदोलन:आप च्या आंदोलनकर्त्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेरणा कारखाना पुन्हा चालु करावा न्यायालयीन प्रक्रियेत अडकवू नका. या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अजित खोत यांच्या नेतृत्वात गुरुवारी बाभळगाव तालुका लातूर येथील आमदार अमित देशमुख यांच्या घरा समोर आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, आंदोलन करण्यापुर्वीच बाभळगावच्या वेशीवर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवत ताब्यात घेतले.

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षापासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पडली. मात्र या टेंडर प्रक्रियेवरून भैरवनाथ शुगर व ट्वेंटी वन शुगर यांच्यामध्ये म्हणजेच आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या संस्थेमध्ये वाद निर्माण झाला आहे. न्यायालयात प्रलंबित असून या बाबत देशमुख व सावंत यांनी न्यायालयाबाहेरच आपसात तडजोड करावी. हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करावा. तसेच न्यायालयीन कुरघोड्या बंद करा व तेरणा सुरु करा या मागणीसाठी बाभळगाव येथील गढी समोर आंदोलन करणार होते. मात्र, आंदोलकांना पोलिसांनी अडवून त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात केली.

आम्हाला याबाबत आश्वासन दिल्याशिवाय पोलिस ठाण्यातून जाणारच नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यावेळी ट्वेंटी वन शुगरच्या उपाध्यक्षाने पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष भेट देऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. कारखान्याचा प्रश्न या दोघांनी तत्काळ न सोडवल्यास आम्ही सर्व सभासदांच्या सह्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन दाद मागणार असल्याचे खोत यांनी सांगितले.

यावेळी आम आदमी पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे, युवक जिल्हाध्यक्ष आकाश कावळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, लातूरचे जिल्हाप्रमुख प्रताप भोसले, लातूर जिल्हाध्यक्ष सचिन औरंगे, लातूर जिल्हा सचिव कुमार खोत, लातूर शहर युवा अध्यक्ष माने, लातूर ग्रामीण अध्यक्ष सतीश कारंडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...