आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:आरती शिंदे, स्वराली ठाकरे यांची योगासन स्पर्धेसाठी निवड

बार्शी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या कव्हे येथील हनुमान विद्यालयाच्या आरती जोतीराम शिंदे व स्वराली गुणवंत ठाकरे या दोन विद्यार्थिनींची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटातील स्पर्धेत आरती शिंदे हिने तृतीय व स्वराली ठाकरे हिने पाचवा क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या आधारे त्यांची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना रामचंद्र ठोंबरे व सिद्धेश्वर फरताडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे संस्थापक सिद्धेश्वर माने, मुख्याध्यापक श्री. बिडवे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...