आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:मुलीवर अत्याचार; बापाला दहा वर्षांचा सश्रम कारावास

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विनयभंग केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी बुधवारी (दि.३०) पित्यास दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.आष्टा कासार येथील पीडित मुलीचे वडील गणपती शंकर कागे याने २८ एप्रिल २०२१ रोजी रात्री नऊ वाजता तो झोपलेल्या खोलीत मुलीला ओढत नेले व तिची इच्छा नसताना आणि ती अज्ञान असताना जन्मदात्या पित्यानेच माणुसकीला काळिमा फासत तिच्यावर बलात्कार करून तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी न्यायालयात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषारोपपत्र ठेवण्यात आले. सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी डॉ. दणाने, डॉ. रुक्मिणी माने,पीडित मुलगी, पीडित मुलीची आई, तपासणी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक समाधान कवडे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. यामध्ये न्यायालयासमोर आलेला पुरावा, सहायक अभियोक्ता ॲड. संदीप देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरला. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला. हवालदार चैतन्य कोंगुलवार यांनी पैरवी म्हणून काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...