आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचे दुर्लक्ष:विजेच्या धोकादायक खांबांमुळे दुर्घटना शक्य; महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

परंडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात विजेच्या धोकादायक खांबांमुळे दुर्घटनेची शक्यता आहे. हे खांब बदलण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, मागील एक वर्षापासून कुजलेले विजेचे खांब बदलण्याची मागणी आहे. परंतु महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास कुजलेले खांब पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या कुजलेल्या खांबांवर चढण्यास लाइटमन देखील घाबरतात. अशा धोकादायक विजेच्या खांबांचा सर्व्हे करुन ते बदलण्याची मागणी वर्षभरापासून होत आहे. गतवर्षी महावितरणने मजुरांकडून तीन-चार खांबांच्या समोर नवीन खांब उभारण्यासाठी खड्डे घेतले होते.

परंतु खांब उभारले नाहीत. ते खड्डे बुजून गेले आहेत. एक खांब उभारला परंतु त्यावर तारा ओढल्या नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडल्यास संबंधीत अधिकारी जबाबदार असतील.निवेदनावर आरटीआयचे तालुकाध्यक्ष फारुख शेख, राहुल बनसोडे, नवनाथ कसबे, विजय मेहेर, अमित आगरकर, कानिफनाथ सरपणे, फारूक मुलाणी, जावेद शेख, मुस्तकी शेख, अविनाश बनसोडे, आबा कोकाटे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...