आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॉमा केअर सेंटर:अपघात वाढले, कळंब उपजिल्हा रुग्णालयात हवे ट्रॉमा केअर सेंटर

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरातील सर्वच मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात ट्राॅमा केअर सेंटर सुरू करण्याची गरज आहे. सध्या अपघातग्रस्तांना अन्यत्र हलवण्यात मोठ्या प्रमाणात वेळ वाया जात असल्यामुळे त्यांना प्राणास मुकावे लागत आहे. शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वाढल्याने तसेच कळंब-लातूर, कळंब-ढोकी अशी मोठी वाहतूक असणाऱ्या या महामार्गामुळे वाहनांची रहदारी वाढली आहे. परिणामी अपघातांची संख्याही वाढल्यामुळे कळंब येथे अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्याची आवश्यकता आहे. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर करीता भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंबची बाजार पेठ मोठी असल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येथे खरेदी करीता येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तालुक्यातुन सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो.

तर खामगाव-पंढरपूर या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून हा महामार्ग शहरातून जातो. कळंब लातूर व कळंब-ढोकी-तेर या मार्गाचे हायब्रीड अॅन्युटीमधून पूर्ण होते आले आहे. त्यामुळेही आता अवजड व अन्य वाहनांची रहदारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. वाढणाऱ्या वाहतुकीमुळे होणारे संभाव्य अपघात लक्षात घेता प्रशासनाने या अपघातग्रस्तांना तातडीने तरी वैद्यकीय मदत मिळावी व उपचारग्रस्तांचे प्राण वाचावे, यासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सुरू करणे आवश्यक आहे. या करीता लोकप्रतिनिधी व नागरिकांचा रेटा वाढण्याची गरज आहे.

अन्य ठिकाणी जाण्यासाठी एक तास
कळंब तालुक्यातील अपघातग्रस्तांना अंबाजोगाई, उस्मानाबाद येथे हलवावे लागते. १ तासाचा वेळ लागतो. उपचाराअभावी मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कळंबपासून २५-३० किमीच्या परिसरात अपघात झाला तरी कळंब येथील ट्रॉमा केअर मध्ये तुलनेने लवकर उपचार मिळू शकतील. यामुळे अनेकांचे प्राण वाचतील.

दीड एकर जागा
कळंब येथील ग्रामीण रुग्णालयास मागील काही महिन्यांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आहे. उपजिल्हा रुग्णालयाला व आवश्यक इमारतीसाठी नगरपालिकेने दीड एकर जागा देण्याचा ठराव मंजूर केला होता. सध्या जागा हस्तांतरणचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर मंजुरीसाठी पडून आहे.

सर्व सुविधा एकाच छताखाली
सध्या अपघात झाला तर आपतकालिन स्थितीत उपचार करणाऱ्या डॉक्टरांची टीम उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसते. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मात्र, तज्ज्ञ उपलब्ध असतात. यामुळे कोणत्याही जखमींना तातडीने उपचार मिळतो. यामध्ये सर्जन, डॉक्टर, ऑपरेशन थिएटर, सर्जिकल आयसीयू, प्राथमिक उपचार कक्ष, अत्याधुनिक यंत्रणा व वेगळ्या इमारतीचा व कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.

आरोग्यमंत्र्यांकडून अपेक्षा
आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आरोग्य व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे कळंब येथेही आरोग्य मंत्री यांनी विशेष लक्ष देऊन तात्काळ तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर करीता भरीव निधी करुण द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. आरोग्य विषयक सेवा देत असताना कळंब तालुक्यावर पूर्वीपासून अन्याय झाला आहे. यामुळे याची कसर भरून काढण्यासाठी ट्रॉमा सेंटर आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...