आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:90 ठिकाणी दुभाजक तुटल्याने, सिग्नल नसल्याने झाले अपघात

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात विविध ठिकाणी दुभाजक तुटले असल्याने त्यातून होणाऱ्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. अशा ९० ठिकाणी पोलिसांनी पाहणी करुन आपला अहवाल संबंधीत यंत्रणेला दिला असून दुरुस्ती करण्याची सुचना केली आहे. महामार्गांवर वारंवार रस्ता अपघात झालेल्या १९३ प्रकरणात त्या घटनास्थळी वाहतुक पोलिसांनी भेट देउन अपघाताची परिस्थिती जाणून घेतली. ७६ अपघातांची माहिती परिवहन मंत्रालय, भारत सरकार यांच्या ‘रस्ता अपघात एकात्मिक माहिती संग्रह’ या प्रणालीत भरली आहे. उर्वरीत ११७ प्रकरणांची माहिती भरत आहे. दुसरीकडे ज्या ९० ठिकाणी अपघाताने अनेकांचे जीव घेतले अशा ठिकाणीही पाहणी केली. यात रस्त्याचा दर्जा, वाहतुक चिन्हे इत्यादी विषयी संबंधीत रस्त्याच्या देखभाल यंत्रणा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग इत्यादींशी समन्वय साधून कळवण्यात आली. या सोबतच रस्ता दुभाजक तुटलेले असल्याने किंवा त्यात अंतर असल्याने त्यामधून होणाऱ्या नियमबाह्य वाहतुकीमुळे अपघात घडतात म्हणुन असे रस्ता दुभाजक सलग करण्याकरीता, रस्त्याच्या देखभालीकरीता तसेच मुख्य रस्त्यांवरील तिठा, चौकांत वाहतुक नियंत्रक दिवे लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व देखभाल यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...