आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी व्यक्त केले. परंडा येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात आयोजित मतदार नोंदणी शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी बीएलओ भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी अर्ज कसा भरावा, कोणता अर्ज भरावा व अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडावीत, अशा विविध मतदान नोंदणी प्रक्रियेसंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. परंडा येथील गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात परंडा तहसील विभाग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मतदान नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. सुनिल जाधव, डॉ. हरिश्चंद्र गायकवाड, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रा. अमर गोरेपाटील, बीएलओ भाऊसाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते.महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांनी आभार मानले.
वर्षातून चारदा नोंदणीची संधी
देवणीकर म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधित्व अधिनियमात सुधारणेनुसार १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षातून चार वेळा मतदार नोंदणीची संधी मिळणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावेत. सहभाग नोंदवून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.