आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील नागरी दवाखान्याचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी मान्यता मिळाल्याचे आ. ज्ञानराज चौगुले यांनी माहिती दिली आहे.
गुंजोटी, कदेर, कसगी आदी परिसरातील मोठ्या गावांचे मुळज प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे या गावांना, ग्रामस्थांना आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी गैरसोय होत होती. तसेच गुंजोटी हे पूर्वी जिल्ह्याचे ठिकाण असलेले व मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र होणे बाबत मागील वीस वर्षापासूनची मागणी होती. माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या सौ. क्रांतीताई किशोर व्हटकर, स्थानिक आजी माजी सरपंच यांनी वारंवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपले राजकीय वजन वापरून गुंजोटीकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी वरिष्ठ पातळीवर लावून धरत मंजुरी मिळवली.
त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुंजोटी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. विशेषतः सदर प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी गुंजोटी ग्रामस्थांनी यापूर्वीच लोकवर्गणीतून जागा खरेदी करून ठेवलेली आहे. या निर्णयाबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.