आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:पारा येथील खून प्रकरणातील आरोपीस अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पारा येथे चारित्र्याच्या संशयावरून दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या आरोपी पतीला वाशी पोलिसांनी अटक केली. सोमवारी( दि.९) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी राहणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच शुक्रवारी गायरान परिसरात दगडाने ठेचून तिचा खून करून पसार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या बाबत मयत महिलेच्या आई सखुबाई शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बापू मच्छिंद्र काळे यांच्या विरोधात वाशी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी पसार असल्याने पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांनी दोन पथकांची स्थापना करून आरोपींचा शोध घेण्यास प्रारंभ केला.

आरोपीचा मोबाईल सुरू आल्याने फौजदार किशोर काळे, फौजदार प्रियंका फंड यांनी त्याचे लोकेशन काढत पथकाला तपास पथकाला वेळोवेळी माहिती दिली. त्यामुळे आरोपी पुणे जिल्ह्यातील निगडी भागामध्ये असल्याचे स्पष्ट झाले. वाशी ठाण्याचे फौजदार पवन निंबाळकर, नासिर सय्यद आणि दोन होमगार्ड या चार जणांचे पथक आरोपीला अटक करण्यासाठी रवाना झाले होते. सोमवारी पहाटे निगडी पोलिसांच्या मदतीने तपास पथकाने आरोपीस अटक केली. तेथून वाशी गाठत न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...