आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील संत मीरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली असून ३० व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धा २०२२ मध्ये संत मीरा पब्लिक स्कूलच्या इयत्ता सातवी मधील समृद्धी कांबळे व सिद्धांत पवार विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बाल विज्ञान ऑनलाईन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांनी “कफ व सर्दी चे मानवी शरीरावर होणारे परिणाम” हा प्रकल्प सादरीकरण केला. त्यामुळे या प्रकल्पाची निवड राज्यस्तरावर झाली आहे. तसेच तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षे वयोगटा अंतर्गत इयत्ता आठवी मधून गौरी गुजलवाड व सुमित गिरी यांनी अनुक्रमे तालुक्यातून दुसरा व तिसरा क्रमांक पटकावून यश मिळवले.
यावेळी क्रीडा शिक्षक रामेश्वर चोबे, क्रीडा शिक्षिका शाहीन हन्नुरे, क्रीडा मार्गदर्शक महेश शिंदे प्राचार्य अशोक राठोड, प्रसाद अंधारे उपस्थित होते.सर्व यशस्वी विद्यार्थी, विजयी संघ व मार्गदर्शक शिक्षकांचा स्कुलच्या वतीने प्राचार्य संतोष भांडवलकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ.सरपणे, ॲड.तानाजी गरड, रतन पठाण, मोहसीन शेख, सतीश भराटे, महेश शिंदे, प्रियंका जंगम, घाडगे सर, मदनसिंह सद्दिवाल, उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,आमदार तथा उपाध्यक्ष डॉ.राहुल पाटील सचिव उदयसिंह पाटील,डॉ.शिल्पा पाटील आदीनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतही यश
राष्ट्रीय बाल विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रभारी गटशिक्षण अधिकारी सूर्यभान हाके, विस्तार अधिकारी अशोक खुळे, विज्ञान समन्वयक काळे विज्ञान शिक्षिका अश्विनी मोरे, अनुराधा गव्हाळे तसेच क्रीडा शिक्षक अमित कांबळे आदीनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद उस्मानाबाद व परंडा तालुका शिक्षण विभागतर्फे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ साठी घेण्यात येत असलेल्या व्हाॅलीबॉल स्पर्धा शाळेच्या मैदानात घेण्यात आल्या.यामध्ये शाळेच्या १७ वर्ष गटातील दोन्हीही मुले व मुलींचे संघ प्रथम क्रमांकाने विजयी ठरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.