आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्तता:आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या‎ आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता‎

भूम11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील १५ वर्षीय मुलीस अलमप्रभू नगरातील‎ अविनाश भारती याने वारंवार प्रेमपत्र देत व फोनवर त्रास‎ दिला. यामुळे या मुलीने २४ नोव्हेंबर १४ रोजी विष घेत‎ आत्महत्या केली होती. तक्रारीवरून भूम पोलिसांनी‎ आरोपी भारती याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त‎ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तपास पूर्ण करून भूम‎ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भूम न्यायालयात दोषारोप पत्र‎ दाखल केले होते.

प्रकरणाची सुनावणी भूम येथील सत्र‎ न्यायधीश एस. आर. पाटील यांच्यासमोर झाली. सरकार‎ पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले. परंतु आरोपीतर्फे अॅड.‎ सिराज मोगल यांनी केलेला युक्तिवाद व बचाव गृहीत‎ धरून पाटील यांनी भारती यांची निर्दोष मुक्तता केली.‎ अॅड. सिराज यांना अॅड. सोहेल शेख, अॅड, तौफिक‎ शेख, अॅड. सतीश कालवटकर, अॅड. हुसेन सय्यद व‎ अॅड. किशोर डोंबाळे यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...