आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडाकेबाज कारवाई:भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई,‎ ‘फूक’कडून धुरगुडेंचा सत्कार‎

धाराशिव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सध्या लोचखोरांविरूद्ध‎ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने‎ धडाकेबाज कारवाई करण्यात येत आहे.‎ सहायक नगररचनाकार मयुरेश केंद्र यांनी‎ सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील अकृषी‎ जमिनीसंदर्भात संदर्भात सहा लाख रुपयांची‎ लाच मागितली असता महेंद्र धुरगुडे यांनी‎ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क‎ साधून संबंधित अधिकाऱ्याला पकडून दिले.‎ राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने‎ भ्रष्टाचाराविरोधी केलेल्या कार्याबद्दल फोरम‎ ऑफ सिटिझन (फूक) संघटनेच्या वतीने‎ महेंद्र धुरगुडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार‎ करण्यात आला. यावेळी फूक संघटनेने‎ म्हटले की, भ्रष्टाचाराविरोधी फूक संघटनेने‎‎‎‎‎‎‎‎‎ नेहमीच आवाज उठवला आहे. मान्यवरांनी‎ मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संघटनेचे डॉ.‎ रमेश दापके देशमुख, सचिव धर्मवीर कदम,‎ अब्दुल लतिफ, गणेश रानबा वाघमारे,‎ राजाभाऊ माळी, रंगनाथ भोसले, रमेश‎ बाराते, राहुल कदम आदी उपस्थित होते.‎ कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राजाभाऊ माळी‎ यांनी केले तर आभार धर्मवीर कदम यांनी‎ मानले.‎