आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले. तसेच जुगार साहित्य जप्त केले. संबंधीत पोलिस ठाण्यांतर्गत कारवाई केली.
अवैध जुगार विरोधी कारवाई दरम्यान पोलिसांनी एक जून रोजी जिल्हाभरात छापे मारुन कारवाई केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता सुदाम देवकर, संतोष सुतार हे दोघे डॉ. आंबेडकर चौक, तुळजापूर येथील एका पान टपरीमध्ये मिलन नाइट मटका जुगार साहित्यासह ३४ हजार ५९० रुपयांसह तर उमेश खांडेकर, फिरोज अन्सारी हे दोघे काक्रंबा गावातील एका पत्रा शेडसमोर मटका जुगार साहित्यासह २५ हजार रुपयांसह आढळले.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्या पथकाने उस्मानाबाद येथे दोन ठिकाणी छापे टाकले असता तुळजाई ज्ञानेश्वर मंदिरासमोर अहमद शेख हे कल्याण मटका जुगार साहित्यासह चार हजार ८६० रुपयांसह तर छ. शिवाजी महाराज चौक येथे चंद्रकांत करवर हे मिलन नाइट मटका जुगार साहित्यासह एक हजार ८५० रुपयांसह आढळले. नळदुर्ग पोलिसांना अहेमद शेख, रूपेश वाघमारे हे दोघे नळदुर्ग बस स्थानकाजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह १६ हजार १२० रुपयांसह आढळून आले. लोहारा पोलिसांना फारुख शेख, दिलीप साठे, सतीश राजपुत हे तिघे मिलन डे मटका जुगार साहित्यासह ६६५ रुपयांसह आढळले. तसेच परंडा पोलिसांना विरेंद्र पाटील हे माणकेश्वर गावातील एका पान टपरीमध्ये कल्याण मटका जुगार साहित्यासह आठ हजार ५२० रुपयांसह आढळून आले. पोलिसांनी साहित्य जप्त व रोख रक्कम जप्त करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.