आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू:चिंचपूर ढगे अवैध वाळू प्रकरणात कारवाई ; दहा लाखांवर दंड, महसूल विभागाची कारवाई

भूम22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील बाणगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपशा करणाऱ्या एका जेसीबी मशिनसह सह दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची १० दहा लाख ४१ हजार ४७६ रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील बाणगंगा नदी पात्रात दि.२९ रोजी बाणगंगा नदी पात्रात रात्रीच्या वेळी वाळू उपसा चालू असल्याची गुप्त माहिती महसूलच्या गौण खनिज पथकास मिळाली होती. महसूल विभागाचे गौण खनिज पथक गुप्त माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या सूचनेनुसार कार्यालयातील तलाठी व अन्य कर्मचारी यांचे पथक सज्ज झाले. उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे व तहसिलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्यासह रात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात गेले असता त्याठिकाणी अवैधरित्या वाळू उत्खनन करताना एक जेसीबी मशिन व दोन ट्रॅक्टर बाणगंगा नदी पात्रात पकडले होते. महसूलच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन वाहने जप्त केली होती. जप्त करण्यात आलेली जेसीबी व दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहेत. या जप्त करण्यात आलेल्या जेसीबी मालक सोमनाथ दादा रसाळ यांना ७ लाख ५० हजार रुपये दंड ठोठवण्यात आला आहे तर ट्रॅक्टर मालक प्रताप वसंतराव परंडकर यांना १ लाख ४५ हजार ७३८ रुपये व सुदर्शन लक्ष्मण ढगे यांच्या ट्रॅक्टरवर १ लाख ४५ हजार ७३८ रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. संबधींताना उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी मोठी दंडात्मक कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. कार्यवाही वेळी मंडळ अधिकारी अनिल महामुनी, तलाठी प्रकाश पाटील , लक्ष्मण कांबळे, पी.एस. धुमाळ, अमित धानुरे, एन.के. केदार, विष्णू थोरात, युवराज हाके, हरी पवार, धनंजय निर्फळ, मुकेश साठे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...