आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मद्य विक्रीवर कारवाई

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील औराद पाटीवर तीन धाब्यांवर वेगवेगळ्या कारवाईत ४४ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि.१७) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली. सेक्टर पेट्रोलिंगवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. जाधवर व पोलिस कर्मचारी औराद गावाकडे जाताना गुप्त माहितीवरून औराद पाटीवरील शिवराज धाबा येथे संजय यशवंत यमगर विना परवाना देशी व विदेशी दारूची विक्री करीत असलेली माहिती मिळाली.

पेट्रोलिंगवर असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांच्या समक्ष छापा टाकून रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की ५८ बॉटल प्रत्येकी १८० रुपयांप्रमाणे एकूण १०४४० रुपये, मॅकडॉल नंबर एक ५६ बॉटल्स प्रत्येकी १६० रुपयांप्रमाणे एकूण ८९६० रूपये, इंपेरिअल ब्ल्यू ४८ बॉटल्स प्रत्येकी १५० रुपयांप्रमाणे ७२०० रुपये, देशी दारूच्या ९० एमएल २०० बॉटल्स प्रत्येकी ३५ रुपयांप्रमाणे सात हजार, असा एकूण ३३, ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलीस कॉन्स्टेबल संभाजी घुले यांच्या फिर्यादीवरून जप्त करत संजय यमगर (कसगी वाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

तसेच औराद पाटीवर आशीर्वाद धाब्यावर पथकाने छापा टाकून लिंबाजी गोपा राठोड विना परवाना देशी व विदेशी दारू विक्री करताना त्यांच्याकडून रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की १७ बॉटल्स अंदाजे ३०६० रुपये, मॅकडॉल नंबर एक २० बॉटल्स अंदाजे ३२०० असा एकूण ६२६० रुपयांचा माल जप्त करून संभाजी घुले यांच्या फिर्यादीवरून लिंबाजी राठोड (कदेर तांडा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

तिसऱ्या कारवाईत औराद पाटी येथील सुजल धाबा येथे प्रमोद हिरालाल जगताप देशी व विदेशी दारू विना परवाना विक्री करत असल्याने वरील पथकाने छापा टाकून त्यांच्याकडून इंपिरियल ब्ल्यू कंपनीच्या १८ बॉटल्स अंदाजे किमत २७०० व देशी दारूच्या ४५ बॉटल्स अंदाजे किंमत १५७५ रुपये असा एकूण ४२७५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल विनोद मोरे यांच्या फिर्यादीवरून प्रमोद जगताप (गुंजोटी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. तीन ठिकाणी कारवाईत ४७ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांवर गुन्हा दाखल आला. पंचासमक्ष जप्त केलेल्या विविध कंपनीच्या प्रत्येकी एक बॉटल सीए तपासकामी ठेवली. पंचनामा एपीआय आर. बी. जाधवर यांनी पंच व पोलिसांसमोर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...