आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:हनुमान मंदिर पुजाऱ्याच्या खून प्रकरणी कारवाईची करावी: पेशवा युवा मंच

परंडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथील हनुमान मंदिराचे पुजारी संतोष पाठक यांच्या खून प्रकरणातील संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पेशवा युवा मंचच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आंबेजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथे शनिवार (दि.२) दुपारी १ च्या सुमारास गावातील भाविक वर्षाचे फल संतोष पाठक यांना सांगणार होते म्हणुन जमू लागले होते.यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांना बोलावुन त्यांच्यावर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.सदरील प्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.जेणेकरून यापुढे असे अनुचित प्रकार घडु नयेत आणि जाती जातीत तेढ वाढू नये. पुरोहितांस संरक्षण देण्यात यावे.

निवेदनावर शिवसेनेचे नगरसेवक मकरंद जोशी, पेशवा युवामंचचे अध्यक्ष अमीत जोशी, पुरोहीत पेशवा मंचचे राजीव कुलकर्णी, अनुप महाराज, अमोल वांभुरकर व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.आंबेजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथील हनुमान मंदिराचे पुजारी संतोष पाठक यांच्या खुन प्रकरणातील संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पेशवा युवा मंचच्या वतीने तहसीलदार निवेदनाव्दारे करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...