आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैध मद्यविरोधी कारवाई दरम्यान धाराशिव पोलिसांनी १० मार्चला जिल्हाभरात एकुण पाच कारवाया केल्या. यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारू निर्मितीचा ६०० लिटर आंबवलेला द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला. ५५ लिटर गावठी दारू, देशी-विदेशी दारूच्या ११५ बाटल्या, असे मद्य जप्त केले. नष्ट केलेल्या द्रवपदार्थासह जप्त केलेल्या मद्याची अंदाजे किंमत ७४,७१५ रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवैध मद्य जप्त करून संबंधित पोलिस ठाण्यात पाच गुन्हे नोंदवले आहेत. वाशी पोलिस ठाण्याच्या पथकाला सरमकुंडी येथील समाधान काळे हे पावणेसात वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोर ४० लिटर गावठी दारूसह ६०० लिटर आंबलेला द्रवपदार्थ अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
धाराशिव शहर पोलिस ठाण्याच्या पथकास शेकापूर येथील कैलास पिसे रात्री ९ वाजेच्या सुमारास हॉटेल जगदंब येथे देशी-विदेशी दारूच्या ६७ सीलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. लोहारा पोलिस ठाण्याच्या पथकाला लोहारा येथील इस्माइल शेख, राजेश गुनेवार रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास शिवकरपाटी जवळ हिप्परगा (खा) येथे देशी-विदेशी दारूच्या ४८ सीलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. उमरगा पोलिस ठाण्याच्या पथकास शास्त्रीनगर येथील दिगंबर राठोड सायंकाळी ७.२० वाजेच्या सुमारास विश्वा बियर बारच्या बाजुला पानटपरीसमोर १५ लिटर गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या पथकास चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील चंद्रकांत गायकवाड हे अडीच वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीजवळ देशी-विदेशी दारूच्या १५,२७५ रुपयांच्या सीलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.