आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा;  अग्निवीरच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निवीर योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष आदीत्य जीवनराव गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले होते. भर पावसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी तीव्र निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष गोरे म्हणाले की, देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी तीनही सैन्यदलांतील जवान अहोरात्र लढत असतात. “अग्निवीर” या नावाखाली भावी सैनिकांचे भविष्य अधिक सुरक्षित करण्याचे सोडून नरेंद्र मोदी यांनी कंत्राटी पद्धतीने केवळ चार वर्षांसाठी सैनिकांची भरती करण्याचा तुघलकी फतवा काढला आहे. तरुणांचे भविष्य अनिश्चीततेच्या अग्निपथावर ढकलण्याचे काम मोदी करत आहेत. हा तुघलकी निर्णय तातडीने मागे घ्यावा.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दादा पाटील, सुदर्शन करंजकर, राष्ट्रवादी विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, संदिप गंगणे, नितीन रोचकरी, तौफिक शेख, रॉबीन बगाडे, उमेश पवार, रोहित चव्हाण, समर्थ पैलवान, वैभव शिंदे, भागवत भंडारकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...