आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोत्साहन:भुयारचिंचोली येथे वृद्ध तसेच मुलींच्या जन्म व विवाहासाठी मदतीचा उपक्रम

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भुयार चिंचोली येथील सरपंच रणजीत गायकवाड यांच्या पुढाकारातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रमा अंतर्गत गावातील मुलींच्या लग्नासाठी तसेच जन्मानंतर प्रत्येकी ५ हजार रुपये, गावातील ज्येष्ठांना ब्लॅंकेट चे वाटप उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांच्या हस्ते शनिवारी (दि. २९) करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी जिल्हा सचिव नितीन बागल, जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी, लोहारा तालुका अध्यक्ष सुनील साळुंखे, युवक अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे संचालक गोविंदराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सन २०२२मध्ये जन्मलेल्या बारा मुलींना ग्रामपंचायतच्या वतीने प्रोत्साहन निधी तर सन २०२२ मध्ये लग्न झालेल्या गावातील सतरा मुलींच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत, थोडेसे मायबापासाठी या उपक्रमांतर्गत गावातील २५० ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेटचे वितरण, ग्रामपंचायतीमार्फत गावातील ४५महिलांना शिलाईचे प्रशिक्षण प्रमाणपत्र ,गावातील २०० मुस्लिम कुटुंबीयांना फराळाचे वाटप या विविध उपक्रमाचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले .या वेळी सरपंच रणजित गायकवाड, ग्रामसेवक बी. व्ही. हंगरगेकर, अॅड. संजय पाटील, सचिन गायकवाड, उमरगा शहराध्यक्ष खाजा मुजावर, युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार,नेताजी कवठे, कुमार थिटे, प्रमोद गायकवाड, सुधाकर पाटील ,लाडलेसाब तांबोळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...