आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भावना दुखावणारे कृत्य ; आक्षेपार्ह विधानांविरोधात कारवाईची मागणी

उमरगा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा व नवी दिल्लीचे भाजपा मीडियाप्रमुख नवीन जिंदाल यांना अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी मंगळवारी (दि १४) मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली. उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांना दिलेल्या निवेदना मध्ये म्हटले की, भारतीय जनता पार्टीच्या नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर जाणीवपूर्वक आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधान करून भावना दुखावणारे कृत्य केलेले आहे. निवेदनावर जाहेद मुल्ला, बाबा जाफरी, शमशोद्दीन जमादार, मुजीब इनामदार, रसूल लदाफ, वसीम लदाफ, नदीम मुजावर, उस्मान मुल्ला यांच्यासह मुस्लिम समाजबांधवांनाच्या सह्या आहेत.

गुंजोटी मुस्लिम समाजाचे निवेदन
भाजप निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा,नवी दिल्ली भाजपा मीडियाप्रमुख नवीन जिंदाल यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी मंगळवारी (दि १४) गुंजोटी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनावर हारून मुजावर, जुबेर काझी, अनवर सौदागर, उस्मान सय्यद, अझहर पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...