आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार यांच्या निषेध:अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू संघटनेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वादग्रस्त विधान केले होते. वास्तविक संभाजी महाराज यांनी धर्म व स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिल्याने ते धर्मवीर व स्वराज्यारक्षकही आहेत. पवारांनी आमच्या श्रद्धास्थानावर घाव घातला आहे, असा आरोप करत हिंदू संघटनांनी मिळून त्यांचा प्रतिमेला जोडे मारून निषेध केला आहे.

अजित पवारांनी समोर येऊन वक्तव्य मागे घ्यावे व संपूर्ण हिंदू समाजाची हात जोडून माफी मागावी, अशी मागणीही यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली. यावेळी अजिंक्य मुंडे, अभिजित मगर, प्रतिक मेंढेकर, सागर पवार, विवेकानंद सावंत, अजिंक्य मुळे, अनिल जत्ती, धीरज साळुंके उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...