आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:भाजपकडून पवारांच्या प्रतिमेला जोडे ; छत्रपती संभाजीराजे यांच्या जयजयकाराच्या घोषणा

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेत छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणू नये, असा हट्टाग्रह धरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विधानाचा निषेध करत सोमवारी भाजपच्या वतीने पवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील व सुजितसिंह ठाकूर यांचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, अभय इंगळे, सरचिटणीस नितीन भोसले, प्रदीप शिंदे, पांडुरंग पवार, पांडुरंग लाटे, मकरंद पाटील, इंद्रजीत देवकते, शहराध्यक्ष राहुल काकडे, ओम नाईकवाडी, विनोद निंबाळकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...