आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरावरून परवानगी:उस्मानाबादेत 10 शिक्षकांचे समायोजन ; प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया होणार

उस्मानाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शाळेत अध्यापन करणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांचे तालुकास्तरावर समायोजन केले. यात कळंब तालुक्यात सर्वाधिक १५ तर उमरगा तालुक्यात १२ शिक्षकांचे समायोजन झाले. येत्या महिन्यात जिल्हा परिषद शाळेत अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया होणार आहे. तत्पूर्वी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले. मंगळवारी सर्व ८ तालुक्यांमध्ये समायोजन प्रक्रिया केली. यामध्ये कळंब तालुक्यात सर्वाधिक १५ शिक्षकांचे समायोजन झाले. येथे २० जागा रिक्त आहेत.

उमरगा तालुक्यात १२ शिक्षकांचे समायोजन झाले असून येथे १९ जागा रिक्त आहेत. उस्मानाबाद तालुक्यात तब्बल ६१ जागा रिक्त असून येथे दहा शिक्षकांचे समायोजन झाले. तुळजापूर तालुक्यात ७९ जागा रिक्त असताना सहा जणांचे, भूम तालुक्यात २६ जागा रिक्त असताना पाच जणांचे, वाशी तालुक्यात आठ जागा रिक्त असताना दोघांचे, लोहारा तालुक्यात सात जागा रिक्त असताना तिघांचे समायोजन झाले. परंडा तालुक्यातील समायोजन प्रक्रियेची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, हे तात्पुरते समायोजन असून बदली प्रक्रियेत स्पष्टपणे जागांचे विवरण समजण्यासाठी समायोजन प्रक्रिया राबवण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून ही प्रक्रिया राबवण्यासाठी राज्यस्तरावरून परवानगी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...