आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:संस्थाचालकांची शिक्षकास मारहाण, अध्यक्ष, सचिवावर गुन्हा‎

काक्रंबा‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील छत्रपती‎ संभाजीराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित‎ मातोश्री त्रिवेणीबाई मोरे कनिष्ठ‎ महाविद्यालयातील वाद विकाेपाला गेला असून‎ शिक्षकाला संस्थाचालकांनी बेदम मारहाण‎ केली. या प्रकरणात अध्यक्ष, सचिवांसह‎ तिघांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात‎ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे. बारावी बोर्डाची परीक्षा सुरू असतानाच‎ हा प्रकार घडला आहे.‎

महाविद्यालयातील शिक्षक व संस्थाध्यक्ष,‎ संचालकात दोन वर्षांपासून वाद सुरू आहे.‎ शुक्रवारी सकाळी शिक्षक शिकवण्यासाठी गेले‎ असता संस्थाध्यक्ष बाळासाहेब विठ्ठल मोरे,‎ सचिव रणजित विठ्ठल मोरे व विठ्ठल जगन्नाथ‎ मोरे यांनी त्यांना येण्यास प्रतिबंध केला. यामुळे‎ शिक्षक संजयकुमार पाचंगे यांनी मोबाइलवर‎ व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा‎ तिघांनी त्यांना पकडून मारहाण केली. तसेच‎ त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला. याप्रकरणी‎ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.‎ तपास हवालदार सखाराम मिटके करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...