आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा शोध:शाळाबाह्य 105 विद्यार्थ्यांना विविध शाळांत प्रवेश ; जिल्ह्यात राबवली विशेष मोहीम

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटक्या समाजातील स्थलांतरीत होऊन जिल्ह्यात आलेल्या व विविध ठिकाणी मजूरीचे काम करणाऱ्या १०५ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. त्यांच्या वयोमानानुसार प्रत्येक इयत्तेत प्रवेश देण्याचे काम शाळास्तरावरून करण्यात आले. यासाठी शिक्षकांनी ग्रामीण भागातील विटभट्टीसह विविध ठिकाणी मजूरी करणाऱ्या बालकांचेही यामध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात काही ठिकाणी अद्यापही शिक्षणाविषयी सजगता निर्माण झालेली नाही. घरातील लहान मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी त्यांना पैसा कमावण्यासाठी कामावर जुंपण्यात येते. यासाठी विटभट्टी, शेतीतील कामे, लहान – मोठे कारखाने आदी ठिकाणी काम करण्यासाठी नेले जाते. घरात उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांना बिनदिक्कत कामावर जुपले जाते. यामुळे ही मुले शिक्षणापासून दूर राहतात. अशा मुलांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ५ ते २० जुलैदरम्यान विशेष माेहीम राबवण्यात आली. यामध्ये प्रत्येक केंद्रस्तरावरील पथक व शाळेतील शिक्षकांनीही शोध मोहिमेत भाग घेतला.

यासाठी प्रत्येक विटभट्टी, शेती, रोजगार हमी योजनेची कामे, खासगी दुकाने आदी ठिकाणी थेट भेटी दिल्या. यामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी ५७ मुले शाळा बाह्य असल्याचे आढळून आले. त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी सर्वांनाच प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. यामध्ये सुरुवातीला पालकांचे मन वळवण्यासाठी त्यांचे समुपदेशन करावे लागले. यानंतर पालक प्रवेश देण्यासाठी तयार झाले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या वयोमानानुसार त्या-त्या इयत्तेत प्रवेश मिळाला. त्यांना शाळेत टीकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. शाळेतील शिक्षकांसह शालेय समितीलाही प्रयत्न करावे लागणार आहेत. पालकांशी संपर्क ठेवत जागृती करावी लागेल.

जवळच्या शाळेत प्रवेश
भटकंती करणाऱ्या कुटुंबे थांबवलेल्या गावातीलच जवळच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यासाठी त्यांना मोफत गणवेश व पुस्तके वितरीत करण्यात आली. यासोबतच त्यांना रोज शालेय पोषण आहारही देण्यात येत आहे. आगामी काळात त्यांना विविध प्रकारचे शालेय साहित्यही पुरवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...