आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:किशोरवयीन मुलींची जडणघडण महत्त्वाची, रूपाली आवले यांचे प्रतिपादन

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किशोरवयीन मुलींना संस्कृती विषयक ज्ञान व्यवहारज्ञान तसेच किशोर अवस्थेमधील मानसिक शारीरिक बदलांची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद वाढवण्याची गरज असून, सशक्त समाज निर्मितीसाठी किशोरवयीन मुलींच्या जडणघडणीची आवश्यकता असल्याचे मत अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने सुरू केलेल्या किशोरी विकास प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा संगीता काळे, प्राचार्य अनार साळुंखे, डॉ. मीना जिंतूरकर, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह अॅड. कृष्णा मसलेकर आदी उपस्थित होते.

आवले म्हणाल्या,किशोरवयीन मुलींची पहिली मैत्रीण ही आई असते. आईची आपल्या मुलीशी मैत्री असायला हवी.घरात मुलींनी आईसोबत सतत बोलत राहिले पाहिजे. आज-काल मोबाइलमुळे अनेक गोष्टी हातात आल्या आहेत. त्यामुळे त्यातील चांगले-वाईट समजून घेतले पाहिजे, किशोरवयीन मुलींमधील हार्मोन्समुळे होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याबाबतीत त्यांना रुचेल-पचेल त्या भाषेत वारंवार संवाद करत राहण्याची गरज आहे. किशोरवयीन मुलींमधील कॅल्शियम आयर्न वारंवार तपासणी करून त्यांना पोषण आहार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रास्ताविक उज्वला मसलेकर यांनी केले. आभार जनकल्याण समितीचे जिल्हा सहकार्यवाह गिरीश पाटील यांनी मानले.

दुसऱ्या शनिवारी प्रकल्पातून मुलींना मार्गदर्शन
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी शहरातील आर्य चाणक्य विद्यालयात किशोरी विकास प्रकल्प चालवला जाणार असून, त्यामध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन मिळणार आहे.किशोरी विकास प्रकल्पात प्रवेश घेण्यासाठी माधवी भोसरेकर (मोबाइल ९४२१८ ७५२२८)यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर या किशोरी विकास प्रकल्पाच्या संचालन समितीमध्ये प्राचार्य डॉ. अनार साळुंखे, डॉ. मीना जिंतूरकर, डॉ. सोनाली दीक्षित यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...