आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:काटगावात अड्डपालखी मिरवणुकीचे आयोजन ; मोठ्या उत्साहात संपन्न

अणदूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काशीपीठाचे नूतन जगद्गुरू १००८ विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधिश्वर धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचा अड्डपालखी मिरवणूक सोहळा मंगळवारी काटगाव (ता.तुळजापूर) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. काटगाव येथे मंगळवारी सकाळी जगदगुरूंचे आगमन होताच त्यांची पाद्यपूजा करण्यात आल्यानंतर महादेव मंदिरापासून सवाद्य जयघोषात गावातून अड्डपालखी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी राजशेखर महास्वामीजी नंदगाव, रेणुक शिवाचार्य महास्वामीजी मंद्रूप, बालब्रह्मचारी शिवानंद यल्लालिंग महाराज काटगाव हे रथातून मिरवणुकीत सहभागी झाले होते. या धर्मसभेची सुरुवात महास्वामीजींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी आपल्या आशीर्वचनात बोलताना काशी जगदगुरूंनी आजचा हा कार्यक्रम मराठवाड्यातील पहिला मोठा कार्यक्रम असल्याचे नमूद करून मठासाठी सद्भक्तांनी दिलेली देणगी, दान हे समाजाच्या विद्यार्थ्यासाठी तसेच समाजोद्धारासाठी खर्च केला जात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर हभप ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर यांची उपस्थिती होती. या धार्मिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि.प.सदस्य चन्नवीर बेटकर यांनी तर आभार प्रदर्शन महादेव पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...