आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या (भाजयुमो) शहराध्यक्षपदी अॅड. संदीप शेळके तर महिला आघाडी शहराध्यक्षपदी ज्योती भातलवंडे यांची निवड झाली.
येथील भाजप संपर्क कार्यालयात बैठकीत नगरपरिषदेचे माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी ॲड. संतोष सूर्यवंशी, सुखदेव टोंपे, विकास कुलकर्णी, महावीर तनपुरे, ॲड. गणेश खरसडे, साहेबराव पाडुळे, विठ्ठल तिपाले, विठोबा मदने, अन्वर लुटडे, मुस्साभाई हन्नूरे, संकेतसिंह ठाकूर, अनिल पाटील, अरविंद रगडे, प्रमोद लिमकर, तानाजी पाटील, शिवाजी पाटील, कांतीलाल पाटील, सतीश देवकर, श्रीराम देवकर, सुजित परदेशी, गणेश राशीनकर, समीर पठाण, रामकृष्ण घोडके, शशी खोत, परसराम कोळी, दत्ता ठाकरे, अमोल गोफणे आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.