आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद साजरा:माणकेश्वर येथे 21 वर्षांनंतर रंगला वर्ग मित्रमैत्रिणींचा स्नेहमेळा

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील माणकेश्वर येथील लोकमान्य विद्यालयात २००० साली शिकलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.माणकेश्वर येथील लोकमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन २००० च्या दहावीच्या वर्गात शिकत असलेले वर्ग मित्र मैत्रिंनी तब्बल २१ वर्षानंतर दिपावलीच्या निमित्ताने एकत्र येत आनंद साजरा केला.

या स्नेह मेळाव्यात ६०पेक्षा जास्त माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी एकत्र आले होते. माजी विद्यार्थी पुणे येथे विप्रोचे प्रकल्प व्यवस्थापक असलेले रवींद्र काकडे यांनी या स्नेह मेळाव्यासाठी पुढाकार घेऊन पंचायत समितीचे उपसभापती बालाजी गुंजाळ,अतुल जाधव , प्रदीप किरमे, लता अंधारे यांच्या सहकार्यातून स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वांच्या जीवनात घडलेले अनुभव सांगितले. काहींनी शालेय जीवना नंतर केलेला संघर्ष आणि मिळालेले यश याची यशोगाथा कथन केली. धकाधकीच्या व घाईगडबडीच्या जीवनात ही शालेय आयुष्यातील ऋणानुबंध जोपासत मेळाव्याला उपस्थिती लावून शालेय ऋणानुबंध अधिक बळकट केले. अश्विनी गिलबिले यांनी मनोगत व्यक्त करत अतिशय मोलाचा संदेश दिला.

यापुढेही अशाच स्नेह मेळावे आपापल्या कुटुंबियांसमवेत व्हावेत अशी इच्छा अनेकांनी यावेळी व्यक्त केली. रवींद्र काकडे, अतुल जाधव, निजाम चाऊस, बालाजी गुंजाळ व अमोल पांगरकर स्नेह मेळाव्याच्या आयोजनासाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले.रवींद्र काकडे यांनी प्रास्ताविकात या मेळाव्याच्या आयोजनाचे विवेचन केले. तर अतुल जाधव यांनी शालेय ऋणानुबंधांना घट्ट करण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या जुन्या मित्र मित्रणींचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...