आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिशाला झळ:दिवाळीनंतर महागाईत भर, दैनंदिन वस्तूंचे भाव वाढल्याने सामान्यांचे बजेट कोलमडले

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐरवी दिवाळीच्या तोंडावर घरातील किचन साहित्य, वस्तुचे दर वाढवण्यात येतात. नंतर पुन्हा त्याचे दर पूर्ववत होत असतात. यावेळी मात्र, चित्र उलटे झाल्याचे दिसून आले. दिवाळीत तेल, डाळ, मैदा, रवा, गहू, तांदूळ, पोहे आदींचे दर स्थिर असून दिवाळी झाल्यानंतर त्यात पाच ते दहा रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शेंगदाण्याचे दर उतरले असून साखरे स्थिर आहे.

दिवाळी काळात सर्वच वस्तू, पदार्थ, कपडे, दागिन्यांचे दर यासह महामंडळाच्या एसटीचेही भाडे काही काळासाठी वाढवण्यात येत असते. यावेळी मात्र, हा प्रकार उलट झाल्याचे दिसून आले. दिवाळी मध्ये १३० ते १३२ रुपयांना असलेली तेल बॅग दिवाळी संपल्यानंतर गोड तेलाचे दर थेट १४५ रुपये प्रती लिटर (एक बॅग) या प्रमाणे झाली होते. मात्र, मंगळवारपासून तेलाच्या दरात घसरण होत असल्याचे दिसून आले. बुधवारी तेलाचे दर १३२ रुपये इतके झाले. त्याच बरोबर दिवाळीत १०८ ते ११० रुपये प्रती किलो प्रमाणे विक्री होणारे शेंगदाण्याचे दर १०५ रुपये प्रती किलो आहेत. . शेंगदाण्याचे दर पाच दिवसांपूर्वी कमी झाले आहेत. विशेष म्हणजे दिवाळीला ३५ ते ३८ रुपये किलोने मिळणारे पोहे आज ४५ रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहेत.

गव्हाच्या पीठ बॅगच्या दरात सर्वाधिक वाढ ज्या महिलांना अथवा विद्यार्थी, कामगार यांना गहू आणून दळून आणणे शक्य होत नाही. त्यांना गव्हाच्या पिठाची बॅग खरेदी करावी लागते. दहा किलोच्या बॅगचे दर दिवाळीत १६० रुपये होते. त्याचा आता दर १८५ रुपये इतका झाला आहे. उच्च प्रतीच्या बॅगची किंमत २०० रुपयांवरून २२० रुपये झाली. तब्बल २० ते २५ रुपयांची यात वाढ झाली आहे.

गहू, ज्वारी, अन्य धान्याला ही भाव चढला दिवाळी अथवा दिवाळीपूर्वी मिळणारा गहू ३० ते ३२ रुपये किलो अथवा क्विंटलला तीन हजार ते ३२०० रुपयांना मिळत होता. आता त्याचे दर थेट ३५०० ते चार हजार रुपये झाले आहेत. तसेच ज्वारीही ३५ रुपयांहून ४० रुपये झाली आहे. बाजरीचे दर काही प्रमाणात स्थिर असल्याचे दिसून आले.

किचनसह अन्य सर्वच वस्तूंच्या दरात वाढ सर्वात अगोदर गव्हाचे दर वाढले. त्यापाठोपाठ तांदूळही महागला. परिणामी पोहे, मैदा, रवा आदींचे दर वाढले. गव्हाची आयात बंद झाल्याने दिवाळीनंतर वस्तुचे दर अधिक वाढले. तेलाचे दर दोन दिवसांत कमी झाले. आता नागरिकांकडूनही साहित्य खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी होत आहे. बालाजी देवशटवार, किराणा मालाचे विक्रेते.

बातम्या आणखी आहेत...