आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ठ काम:आश्वासनानंतर रास्ता रोको मागे ; मोर्डा रोडवरील पूल पावसात वाहून गेला

तुळजापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निकृष्ट दर्जाचा पूल बांधणाऱ्या गुत्तेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासह नव्याने पूल बांधण्याचा मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने तुळजापूर खुर्द येथील मोर्डा रोड वरील पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तुळजापूर खुर्द नजीक मोर्डा तडवळा रस्त्यावरील निकृष्ठ दर्जाचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेला.

यामुळे शासनाचे लाखो रूपये पाण्यात गेले. पूल वाहून गेल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर पावसाळ्यात नागरिकांनाही बाह्यवळण रस्ता मार्गे वळसा घालावा लागला. याप्रकरणी संबंधित अभियंता, ठेकेदारावर कारवाई करण्यासह उंची वाढवून नवीन पूल बांधण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलनच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. संघर्ष समितीच्या वतीने अनेकदा मागण्या केल्या होत्या.

३ महिन्यांत नवीन पूल
पुढील तीन महिन्यात पुलाची उंची वाढवून नवीन पुल बांधण्यासह दोषींवर त्वरित कारवाई करण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता घोडके व विभुते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...