आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:पुन्हा तेच मैदान, तीच गर्दी अन् अभूतपूर्व उत्साह; जल्लोष

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रसिक, प्रेक्षकांनी खचाखच भरलेले मैदान, रात्री एक वाजेपर्यंत महिला, मुलींसह लहान मुलांची प्रचंड गर्दी आणि सांस्कृतीक कार्यक्रम पाहण्यासाठी एकवटलेला उत्साह. हे चित्र २०१७ मधील अखिल भारतीय नाट्य संमेलनातले. पण गुरूवारी (दि.२४) सायंकाळी अगदी तेच मैदान पुन्हा एकदा अभूतपूर्व गर्दी आणि उत्हासाने भरून गेले. निमित्त होते खोखोच्या राष्ट्रीय स्पर्धेचे. या स्पर्धेच्या समारोपासाठी तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमवर तोबा गर्दी झाली आणि उस्मानाबादकरांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आठवण झाली.

वास्तविक नाट्य संमेलन,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर उस्मानाबादकरांनी राष्ट्रीय स्तरावरील खो-खोसारखी स्पर्धा आयोजित करून तसेच दिमाखदारपणे यशस्वी करून मागासलेपणाचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षात ३ मोठ्या कार्यक्रमातून उस्मानाबादकरांनी हेच दाखवून देताना नाट्य, कला, साहित्य, सांस्कृतीक, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातही उस्मानाबादकरांचा दबदबा आहे, हे दाखवून दिले. रविवारपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचा गुरूवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला. पाच दिवसांच्या काळात ही स्पर्धा पाहण्यासाठी उस्मानाबादकरांनी प्रचंड गर्दी केलीच, पण सोलापूर, लातूर, बीडसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातून शेकडो खोखो प्रेमी उस्मानाबादेत दाखल झाले.

खो-खो ची पंढरी, अनेक मैदाने गाजवतील उस्मानाबादकर
उस्मानाबाद ही खो-खोची पंढरी मानली जाते. खाे-खो क्षेत्रात अत्यंत ताकदीने काम करणारे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, अखिल भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक खेळाडू खो-खोतून घडत आहेत. डॉ. जाधव यांनी खो-खोची राष्ट्रीय स्पर्धा उस्मानाबादेत आयोजित करण्याचे दिव्य स्वप्न पाहिले होते.

त्यात त्यांना यश आले आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडंूचा या स्पर्धेत सन्मान झाला, शिवाय त्यांना राष्ट्रीय स्पर्धा आपल्या गावात अनुभवता आली. आगामी काळात उस्मानाबादचे अनेक खेळाडू स्पर्धेचे मैदान गाजवतील, असा विश्वास या स्पर्धेने दुणावला आहे.

बातम्या आणखी आहेत...